Ashes series 2023: जॉनी बेअरस्टोने जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही कराल सलाम
स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने त्याच्या एका चाहत्याला बॅटिंग ग्लोव्हज भेट दिले आहेत. जॉनी बेअरस्टो गिफ्ट देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अॅशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात शानदार दृश्य पाहायला मिळत आहे. ताज्या व्हिडिओमध्ये क्रिकेट चाहत्यांची मने जिंकणारा इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोचा (Jonny Bairstow) आहे. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने त्याच्या एका चाहत्याला बॅटिंग ग्लोव्हज भेट दिले आहेत. जॉनी बेअरस्टो गिफ्ट देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याचा छोटा फॅन क्रॅचच्या साहाय्याने मैदानाच्या गेटजवळ उभा असल्याचे दिसून येते, त्यानंतर जॉनी बेअरस्टो तिथून पुढे जातो, त्याची नजर त्या मुलाकडे जाताच तो त्याच्याकडे जातो.
पहा व्हडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)