Jofra Archer New Record: जोफ्रा आर्चरने आपल्या नावावर नोंदवला 'हा' मोठा विक्रम, पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला टाकले मागे
यासह जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
ENG vs SA 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा (ENG vs SA) 59 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 9.1 षटकात 40 धावा देत 6 बळी घेतले. यासह जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. वास्तविक, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रमचा (Wasim Akram) 30 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर यजमानांविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जोफ्रा आर्चर सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमच्या नावावर होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)