Jay Shah Congratulated Team India: झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे जय शाहने केले अभिनंदन

एकीकडे यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) 39 चेंडूत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Jay Shah (Photo Credit - X)

IND vs ZIM 4th T20I: चौथ्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव (IND Beat ZIM) केला आहे. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना टीम इंडियाची सलामीची भागीदारी तोडता आली नाही. एकीकडे यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) 39 चेंडूत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रथम खेळताना झिम्बाब्वेने स्कोअरबोर्डवर 152 धावा केल्या होत्या आणि भारताने 28 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. या दमदार विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकल्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे ट्विट करत अभिनंदन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या