Jay Shah Congratulated Team India: झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे जय शाहने केले अभिनंदन
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना टीम इंडियाची सलामीची भागीदारी तोडता आली नाही. एकीकडे यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) 39 चेंडूत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
IND vs ZIM 4th T20I: चौथ्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव (IND Beat ZIM) केला आहे. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना टीम इंडियाची सलामीची भागीदारी तोडता आली नाही. एकीकडे यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) 39 चेंडूत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रथम खेळताना झिम्बाब्वेने स्कोअरबोर्डवर 152 धावा केल्या होत्या आणि भारताने 28 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. या दमदार विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकल्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे ट्विट करत अभिनंदन केले आहे.
What a way to clinch the T20I series! 🙌 Top stuff from our young guns! @ybj_19 and @ShubmanGill were spectacular with the bat in the run chase. 🔥 Congratulations to the entire team and support staff on a fantastic series win. 🇮🇳@BCCI || #ZIMvIND pic.twitter.com/0bykDa3bok
— Jay Shah (@JayShah) July 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2024 11:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

