IND vs WI 2023: वेस्ट इंडिज दौऱ्यावर इशांत शर्माची एन्ट्री, कॉमेंट्री करताना दिसणार

भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Ishant Sharma (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची (Ishant Sharma) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली नसली तरी आता तो या मालिकेत कॉमेंट्री बॉक्समध्ये चमकताना दिसणार आहे. म्हणजेच समालोचक म्हणून तो या मालिकेचा भाग असणार आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज इशांत JioCinema वर कॉमेंट्री करेल. भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)