IRE vs NZ: न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा मोठा पराक्रम, पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा ठरला पहिला गोलंदाज (Watch Video)

या सामन्यात प्रथम खेळताना न्यूझीलंडने 4 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान आयर्लंडचा संघ 13.5 षटकांत 91 धावांत गारद झाला. अशाप्रकारे किवी संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Michael Bracewell (Photo Credit - Twitter)

मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडचा ऑफस्पिनर ब्रेसवेलने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 (IRE vs NZ) मध्ये ही कामगिरी केली. ब्रेसवेलने कारकिर्दीतील दुसरा टी-20 खेळताना 5 चेंडूत 3 बळी घेत न्यूझीलंडला 88 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात प्रथम खेळताना न्यूझीलंडने 4 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान आयर्लंडचा संघ 13.5 षटकांत 91 धावांत गारद झाला. अशाप्रकारे किवी संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement