IPL Points Table 2023: चन्नईचा पराभव करुन राजस्थानने गुणतालिकेत मिळवले पहिले स्थान, पहा इतर संघाची पॉइंट टेबलची स्थिती
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा धावांनी पराभव केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 17वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 20 षटकात 8 गडी गमावून 175 धावा केल्या. राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक 52 धावांची तुफानी खेळी खेळली. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा, आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 172 धावा करू शकला. चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर डेव्हन कॉनवेने सर्वाधिक 50 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून आर अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)