IPL 2024: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर LSG चे मालक Sanjiv Goenka संतापले; ऑन कॅमेरा कर्णधार KL Rahul ला सुनावले खडे बोल (Watch Shocking Video)
लखनौ सुपर जायंट्स लाजिरवाण्या पराभवानंतर, एलएसजीचे मालक भारतीय अब्जाधीश संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
IPL 2024: आयपीएल 2024 मधील 57 वा सामना बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने 10 गडी राखून मोठा विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स लाजिरवाण्या पराभवानंतर, एलएसजीचे मालक भारतीय अब्जाधीश संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजीव संघाचा कर्णधार केएल राहुलला फटकारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये संभाषणाचा ऑडिओ ऐकू येत नाही, मात्र गोयंका यांच्या हावभावावरून हे स्पष्ट दिसत आहे की, ते संघाच्या कामगिरीवर चिडले आहेत. गोयंका अतिशय तावातावाने बोलत आहेत आणि संघाचा कर्णधार असलेला केएल राहुल त्यांच्यासमोर असहाय्य उभा आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हेही वाचा: SRH New Record IPL 2024: हैदराबादने रचला इतिहास, 10 गडी राखून सामना जिंकून अनेक विक्रम केले नावावर; मुंबई आयपीएल 2024 मधून बाहेर)
पहा व्हिडिओ-
This is just pathetic from @LucknowIPL owner
Never saw SRH management with players on the field or even closer to dressing room irrespective of so many bad seasons and still face lot of wrath for getting involved. Just look at this @klrahul leave this shit next year #SRHvsLSG pic.twitter.com/6NlAvHMCjJ
— SRI (@srikant5333) May 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2024 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

