IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या सरावात ‘नकोशा पाहुण्यांची’ घुसखोरी, प्रशिक्षकासह खेळाडूंनीही मैदानात घातले लोटांगण (Watch Video)

IPL 2022: मुंबई इंडियन्स संघ त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवून खाते उघडण्यासाठी कंबर कसून तयारी करत आहेत. यादरम्यान बुधवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाश्यांना हल्ला केला आणि प्रशिक्षकासह खेळाडूंनाही त्यांच्यापुढे लोटांगण घालणे भाग पाडले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सवर मधमाशांचा हल्ला (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी आयपीएलचे 15 वे पर्व काही खास ठरलेले नाही. मुंबईने खेळलेले आतापर्यंत सर्व सहा सामन्यात पराभवाची चव चाखली आहे. अशा परिस्थितीत आता टीम त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) विजय मिळवून खाते उघडण्यासाठी कंबर कसून तयारी करत आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात नकोशा पाहुण्यांनी व्यत्यय आणला आणि प्रशिक्षकासह खेळाडूंनाही त्यांच्यापुढे लोटांगण घालणे भाग पडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now