Umran Malik IPL 2022: उमरान मलिकचा खतरनाक बाउन्सर, आणि वेदनेने विव्हळत पंजाबचा कर्णधार मयंक मैदानावर पडला; पाहा व्हिडिओ

IPL 2022 च्या लीग टप्प्यातील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना उमरान मलिकचा एक खतरनाक चेंडू पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालच्या बरगडीला लागला. हा चेंडू सुमारे 143 प्रतितास वेगाचा होता. चेंडू आदळल्यानंतर मयंक मैदानावर वेदनेने विव्हळताना दिसत होता आणि त्यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला.

उमरान मलिकच्या बाउन्सरने मयंक अग्रवाल मैदानात आडवा (Photo Credit: Twitter)

Mayank Agarwal vs Umran Malik Video : आयपीएल (IPL) 2022 चा शेवटचा लीग सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात झाला. सामन्यात पंजाबची फलंदाजी सुरु असताना SRH चा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा (Umran Malik) एक चेंडू पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) अंगावर आदळला आणि तो वेदनेने मैदानावर आडवा झाला. चेंडू थेट मयंकच्या बरगडीला लागला, ज्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या त्यामुळे, सामना काही काळ थांबवावा लागला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now