IPL 2022, SRH vs PBKS: हरप्रीत ब्रारच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज हतबल, पंजाब किंग्ससमोर 158 धावांचे टार्गेट
IPL 2022, SRH vs PBKS: सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 8 बाद 157 धावसंख्या उभारली आणि पंजाब किंग्ससमोर 158 धावांचे आव्हान ठेवले आहे. एकीकदार हरप्रीत ब्रारच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे धुरंधर फलंदाज हतबल दिसले तर, मोक्याच्या क्षणी रोमारियो शेफर्ड आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या महत्वपूर्ण खेळीने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. अभिषेक शर्माने 43 धावांची खेळी केली.
IPL 2022, SRH vs PBKS: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 157 धावसंख्या उभारली आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) समोर 158 धावांचे आव्हान ठेवले आहे. एकीकदार हरप्रीत ब्रारच्या (Harpreet Brar) भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे धुरंधर फलंदाज हतबल दिसले तर, मोक्याच्या क्षणी रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्या महत्वपूर्ण खेळीने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. शेफर्ड धावा करून नाबाद राहिला, तर सुंदरने 21 धावा केल्या. तसेच अभिषेक शर्माने 43 धावांची खेळी केली. दुसरीकडे, हरप्रीत आणि नॅथन एलिस पंजाबचे यशस्वी गोलंदाज ठरले, त्यांनी तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय कगिसो रबाडाने 1 गडी बाद केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)