IPL 2022, SRH vs KKR Match 25: नितीश राणाचा अर्धशतकी तडाखा, आंद्रे रसेलचा ‘पॉवरफुल’ शो; कोलकात्याच्या हैदराबादपुढे 176 धावांचे आव्हान

केकेआरकडून नितीश राणा (Nitish Rana) ने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर आंद्रे रसेलच्या (Andre Russell) फटकेबाजीने संघाला आव्हानात्मक संख्येपर्यंत नेले.

नितीश राणा (Photo Credit: PTI)

IPL 2022, SRH vs KKR: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 25 व्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीने बलाढ्य कोलकाता संघाने निर्धारित षटकांत 8 बाद 175 धावांवर रोखले. अशाप्रकारे सनरायझर्स संघाला विजयासाठी 176 धावांचे आव्हान मिळाले आहे. केकेआरकडून नितीश राणा (Nitish Rana) ने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर आंद्रे रसेलच्या (Andre Russell) फटकेबाजीने संघाला आव्हानात्मक संख्येपर्यंत नेले. रसेल 25 चेंडूत 49 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, हैदराबादसाठी नटराजनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच उमरान मलिकने दोन आणि मार्को जॅन्सन, जगदीशा सुचित व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक गाडी बाद केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif