IPL 2022: प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेली जर्सी घालून RCB पुढील सामन्यात खेळणार, सनरायझर्स हैदराबाद होणार टक्कर

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये, 8 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात RCB चा संघ हिरव्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. बेंगलोरची टीम लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक करण्यासाठी विशेष मोहीम राबवते. आणि या जर्सीच्या माध्यमातून टीम लोकांना आजूबाजूच्या झाडांची काळजी घेण्याचा संदेश देते.

आरसीबी ग्रीन जर्सी (Photo Credit: Twitter/RCBTweets)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध  (Sunrisers Hyderabad) खेळेल तेव्हा त्यांची रंगभूषा बदलेली असेल. फाफ डु प्लेसिसच्या  (Faf du Plessis) नेतृत्वातील संघ लाल आणि काळ्या रंगात नसून हिरव्या जर्सीत दिसणार आहे. 2011 पासून RCB एका सामन्यात हिरवी जर्सी घालते, पण गेल्या वर्षी संघाला असे करता आले नव्हते. मात्र, यावेळी संपूर्ण तयारी करण्यात आली असून आरसीबीकडून जर्सीचे अनावरणही करण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now