IPL 2022: क्वालिफायर 2 पूर्वी RCB ला धक्का, स्टार फलंदाजाला BCCI ने फटकारले
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर 2 सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकला एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रोमहर्षक विजयादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात कार्तिकने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट केलेले नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) आयपीएल आचारसंहितेचा (IPL Code of Conduct) भंग केल्याबद्दल फत्करण्यात आलेलं आहे, असे शुक्रवारी अधिकृत आयपीएल (IPL) मीडिया निवेदनात म्हटले आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे बुधवारी लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध आरसीबीच्या (RCB) एलिमिनेटर सामन्यात कार्तिकने आचारसंहितेचा भंग केला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)