IPL 2022, RCB vs SRH: आयपीएलच्या (IPL) 36 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) गोलंदाजांचा बोलबाला राहिला. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने हैदराबादच्या गोलंदाजांपुढे अक्षरशः लोटांगण घातले आणि निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 68 धावांची 15 व्या पर्वातील सर्वात निच्चांकी धावसंख्या उभारली. आरसीबीसाठी (RCB) सुयश प्रभुदेसाईने 15 आणि ग्लेन मॅक्सवेलने 12 धावा केल्या. तर अन्य फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले. दरम्यान बेंगलोरची वैयक्तिक दुसरी तर आयपीएल इतिहासातील सहावी कमी धावसंख्या ठरली आहे. दुसरीकडे, सनरायझर्ससाठी मार्को जॅन्सन (Marco Jansen) आणि टी नटराजन (T Natarajan) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर जगदीशा सूचितने दोन आणि भुवनेश्वर कुमार व उमरान मलिकने प्रत्येकी एक गडी बाद केला.
68 ALL OUT! BHUVI'S FIRST WICKET, courtesy a lovely catch from Kane Mama! 🔥
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)