IPL 2022: बेंगलोरच्या ताफ्यात सामील झाला नवा चॅलेंजर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये आहे उत्कृष्ट रेकॉर्ड

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणारा पाटीदारने 21 टी-20 सामन्यात 861 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 अर्धशतके ठोकली आहेत. पाटीदारने यापूर्वी चार सामन्यात आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) फ्रँचायझीने रजत पाटीदार (Rajat Patidar) याला जखमी लवनीथ सिसोदियाच्या जागी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या उर्वरित सामन्यासाठी ताफ्यात सामील केले आहे. RCB ने या हंगामात आतापर्यंत 2 सामने खेळले आणि एक सामना जिंकला व एक गमावला आहे. आरसीबी (RCB) आपल्या पुढील सामन्यात राजस्थान रॉयल्सशी 5 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियम येथे भिडतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)