IPL 2022, PBKS vs SRH: उमरान मलिकच्या घातक गोलंदाजीसमोर Liam Livingstone ची झंझावाती खेळी फिकी पडली, हैदराबादने पंजाबला 151 धावांत रोखले

IPL 2022, PBKS vs SRH: उमरन मलिक आणि अनुभवी भुवनेश्वर कुमार यांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला निर्धारित 20 षटकांत 151 धावांवर रोखले. अशाप्रकारे हैदराबादला विजयासाठी अवघे 152 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने 60 धावा केल्या. दुसरीकडे, हैदराबादकडून उमरान मलिकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs SRH: उमरन मलिक (Umran Malik) आणि अनुभवी भुवनेश्वर कुमार  (Bhuvneshwar Kumar) यांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला (Punjab Kings) निर्धारित 20 षटकांत 151 धावांवर रोखले. अशाप्रकारे हैदराबादला विजयासाठी अवघे 152 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने (Liam Livingstone) 60 धावा केल्या. तर शाहरुख खानने 26 धावा काढल्या. दुसरीकडे, हैदराबादकडून उमरान मलिकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तसेच भुवनेश्वरने तीन, टी नटराजन आणि जगदीशा सूचित यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मलिकने डावातील आपल्या शेवटच्या षटकांत एका रनआऊटसह चार विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement