IPL 2022, PBKS vs SRH: उमरन मलिक (Umran Malik) आणि अनुभवी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला (Punjab Kings) निर्धारित 20 षटकांत 151 धावांवर रोखले. अशाप्रकारे हैदराबादला विजयासाठी अवघे 152 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने (Liam Livingstone) 60 धावा केल्या. तर शाहरुख खानने 26 धावा काढल्या. दुसरीकडे, हैदराबादकडून उमरान मलिकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तसेच भुवनेश्वरने तीन, टी नटराजन आणि जगदीशा सूचित यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मलिकने डावातील आपल्या शेवटच्या षटकांत एका रनआऊटसह चार विकेट घेतल्या.
4 wickets for Umran Malik
60 for Liam Livingstone
Do the Punjab Kings have enough runs on the board?
We will find out as we build-up to the SRH run-chase #PBKSvSRH | #TATAIPL
Follow the game here https://t.co/NsKw5lnFjR pic.twitter.com/HNsRtjVWnz
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)