Rohit Sharma याचा ‘दस का दम’, T20 मध्ये 10 हजार धावा करणारा ठरला फक्त दुसरा भारतीय; जाणून कोण आहे नंबर 1

IPL 2022, MI vs PBKS: पुण्यात पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कगिसो रबाडाविरुद्ध जबरदस्त षटकार ठोकून रोहित शर्माने 10,000 धावांच्या क्लबमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3313 धावा केल्या आहेत, तर IPL मध्ये 5662 धावा करून तो टूर्नामेंटमध्ये सर्वकालीन धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने बुधवारी आपल्या सुशोभित कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आणि टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार करणारा केवळ 7वा फलंदाज ठरला. पुण्यातील MCA स्टेडियमवर पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) आयपीएल 2022 च्या 5 व्या सामन्यात रोहितने ऐतिहासिक कामगिरी केली. यासह रोहित 1000 धावांचा टप्पा गाठणारा भारताचा दुसरा सहकारी आणि RCB स्टार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत एलिट यादीत सामील झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now