IPL 2022, MI vs PBKS: पंजाबकडून मुंबईसमोर विजयासाठी 199 धावांचे आव्हान, शिखर धवन याची तुफान कामगिरी; रोहितच्या ‘पलटन’ला आता फलंदाजांकडून आस

पंजाबकडून धवनने सर्वाधिक 70 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबईच्या गोलंदाजांची निराशनजक कामगिरी सुरूच राहिली. बसिल थंपी याने दोन विकेट घेतल्या.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs PBKS Match 23: सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने (Punjab Kings) आपल्या निर्धारित षटकांत 5 बाद 198 धावा केल्या व मुंबईसमोर विजयासाठी 199 धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे. पंजाबकडून धवनने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर मयंकने 52 धावांचे योगदान दिले, तसेच जितेश शर्मा 30 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, मुंबईच्या गोलंदाजांची निराशनजक कामगिरी आजही सुरूच राहिली. बसिल थंपी (Basil Thampi) याने दोन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.