IPL 2022 MI vs KKR Match 14: डेवाल्ड ब्रेविस याची जोरदार सुरुवात, पदार्पण सामन्यात खेचला शानदार ‘नो लूक सिक्स’; पहा व्हिडिओ

IPL 2022 MI vs KKR Match 14: आयपीएल (IPL) 2022 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईने Baby AB म्हणून प्रसिद्ध डेवाल्ड ब्रेविस याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आणि या खेळाडूने 19 चेंडूत 29 धावांचे छोटेखानी योगदान दिले. ब्रेविसने आपल्या खेळीत मारलेला एक ‘नो-लुक सिक्स’ची चाहत्यांमध्येच चांगलीच चर्चा रंगली आहे.

डेवाल्ड ब्रेविसचा नो-लुक सिक्स (Photo Credit: Twitter)

IPL 2022 MI vs KKR Match 14: आयपीएल (IPL) 2022 मध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईने Baby AB म्हणून प्रसिद्ध डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आणि या खेळाडूनेही आपल्या छोट्या खेळीत खूप प्रभावित केले. ब्रेविसने 19 चेंडूत 29 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने दोन षटकारही खेचले. पण त्याच्या एका षटकाराची खूप चर्चा होत आहे, जो त्याने वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर मारला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement