IPL 2022, LSG vs KKR: KL Rahul डायमंड डकचा ठरला बळी, लखनौ मार्गदर्शक गौतम गंभीरच्या ‘त्या’ पराक्रमाशी बरोबरी

IPL 2022, LSG vs KKR: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने त्याचा मार्गदर्शक गौतम गंभीरची नको अशा विक्रमाच्या यादीत बरोबरी केली आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ‘डायमंड डक’चा सामना करावा लागला. आयपीएलमध्ये ‘डायमंड डक’वर बाद होणारा राहुल दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्याच्याआधी गंभीर 2013 मध्ये दिल्लीविरुद्ध ‘डायमंड डक’वर बाद झाला होता.

केएल राहुल डायमंड डकचा बळी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs KKR: आयपीएल 2022 चा 53 वा सामना लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) एकही चेंडू न खेळता बाद झाला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला पहिल्याच षटकात धावबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यामुळे डायमंड डकवर बाद होताच राहुलने LSG चा मार्गदर्शक गौतम गंभीरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now