IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ याचे ताबडतोड अर्धशतक, पंत-सरफराजचा फिनिशिंग टच; लखनऊसमोर विजयासाठी 150 धावांचे टार्गेट
अशाप्रकारे लखनऊ सुपर जायंट्स संघाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान मिळाले आहे. पृथ्वी शॉ याने सर्वाधिक 61 धावा ठोकल्या.
IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे ताबडतोड अर्धशतक, कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) यांच्या अंतिम षटकांत केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निर्धारित 20 षटकांत तीन बाद 149 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान मिळाले आहे. पृथ्वी शॉ याने सर्वाधिक 61 धावा ठोकल्या. तर पंत 39 धावा आणि सरफराज 36 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, लखनऊसाठी रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याने दोन आणि कृष्णप्पा गौथम याने एक गडी बाद केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)