IPL 2022, LSG vs CSK Match 7: रॉबिन उथप्पा - शिवम दुबे यांची ताबडतोड फलंदाजी, चेन्नईचे लखनऊला विजयासाठी 211 धावांचे डोंगराएवढे आव्हान

सीएसकेसाठी रॉबिन उथप्पाने 50 धावा केल्या तर शिवम दुबे याने 49 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लखनऊसाठी रवि बिश्नोई, अँड्र्यू टाय आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

चेन्नई विरुद्ध लखनऊ (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पहिले फलंदाजी करून 20 षटकांत 7 बाद 210 धावा केल्या आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघापुढे विजयासाठी 211 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. सीएसकेसाठी रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) 50 धावा केल्या तर शिवम दुबे (Shivam Dube) याने 49 धावांचे योगदान दिले. तसेच ऋतुराज गायकवाडला वगळता ​​चेन्नई सुपर किंग्स फलंदाजांनी वेगाने धावा काढल्या. मोईन अली याने 35 आणि ,अंबाती रायुडूने 27 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लखनऊसाठी रवि बिश्नोई, अँड्र्यू टाय आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)