IPL 2022, KKR vs SRH: कोलकाताचा टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय, ‘आर या पार’च्या मॅचसाठी असे आहेत दोघांचे Playing XI

IPL 2022, KKR vs SRH: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्सला (SRH) त्यांच्या मागील 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले आहेत. हैदराबाद आणि कोलकात्याच्या ताफ्यात काही महत्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत.

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

IPL 2022, KKR vs SRH Match 61: सनरायझर्स हैदराबाद (Sunriers Hyderabad_ विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्सला (SRH) त्यांच्या मागील 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे आज कोलकाताविरुद्ध पराभव प्लेऑफचे स्वप्न भंग करू शकते. तसेच KKR देखील आज पराभवासह आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघासाठी आजचा सामना ‘आर या पार’चा आहे.

कोलकात्याच्या ताफ्यात उमेश यादव (Umesh Yadav) आणि सॅम बिलिंग्स परतले आहेत. तर टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को मार्को जॅन्सन (Marco Jansen) याचे देखील हैदराबाद प्लेइंग XI मध्ये पुनरागमन झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now