IPL 2022, KKR vs LSG: डी कॉक-राहुलची विस्फोटक फलंदाजी; कोलकात्याच्या गोलंदाजांना फोडला चांगलाच घाम, लखनऊचा 210 धावांचा डोंगर
डी कॉकने सर्वाधिक 140 धावा केल्या तर राहुलने 68 धावा करून त्याला मौल्यवान साथ दिली. डी कॉक आणि राहुलने कोलकात्याला विकेट्ससाठी चांगलाच घाम फोडला.
IPL 2022, KKR vs LSG: डीवाय पाटील स्टेडियमवर कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांच्या जोरदार कामगिरीने लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants0 संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये बिनबाद 210 धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. डी कॉकने सर्वाधिक 140 धावा केल्या तर राहुलने 68 धावा करून त्याला मौल्यवान साथ दिली. डी कॉक आणि राहुलने आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वोच्च सलामीची भागीदारीची नोंद केली आणि कोलकात्याला विकेट्ससाठी चांगलाच घाम फोडला. केकेआरसाठी टिम साउदी आणि आंद्रे रसेल सर्वात महागडे गोलंदाज ठरले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)