IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली, फलंदाजांचा घाम काढण्यासाठी ‘मिनी मलिंगा’ची ताफ्यात झाली एन्ट्री (Watch Video)

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) शिबिरात सामील झाला आहे आणि IPL च्या 15 व्या हंगामाच्या तयारीला लागला आहे. चेन्नई सुपर किंग्सने लसिथ मलिंगाच्या गोलंदाजी शैलीचे चे अनुकरण करताना पथिरानाचा व्हिडिओ शेअर केला. अॅडम मिल्नेच्या जागी चेन्नईच्या ताफ्यात सामील झालेला श्रीलंकेच्या पथिरानाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 3 व्हाईट-बॉल सामने खेळले आहेत.

मथीशा पथिराना (Photo Credit: Twitter/ChennaiIPL)

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) ताफ्यात सामील झाला आहे आणि त्याने चालू इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 हंगामाची तयारी सुरू केली आहे. अंडर-19 विश्वचषकात प्रसिद्धी मिळवणारा पथिराना, लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) गोलंदाजी शैलीचे अचूक अनुकरण करतो आणि त्याच्या फलंदाजांना थक्क करून सोडतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement