Ahmedabad IPL 2022 Team: अहमदाबाद संघाचे अधिकृत नाव जाहीर, जाणून घ्या कोणत्या नावाने ओळखली जाणार ही फ्रेंचायझी

सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील नवीन संघाला गुजरात टायटन्स म्हटले जाईल. CVC समुहाने तब्बल 5625 कोटी रुपयात फ्रँचायझी खरेदी केली.

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

Ahmedabad IPL 2022 Team: आयपीएलच्या (IPL) 2022 सीजनपासून टी-20 मध्ये लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझी सामील होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी Star Sports वर आता अखेरीस अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ‘गुजरात टायटन्स’ (Gujarat Titans) हे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील अहमदाबाद फ्रँचायझीचे (Ahmedabad Franchise) अधिकृत नाव आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)