IPL 2022 Final, GT vs RR: हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानचे ‘राजवाडी’ हतबल, गुजरातसमोर 131 रन्सचे टार्गेट

गुजरातच्या गोलंदाजीपुढे रॉयल्सचे फलंदाज अक्षरशः हतबल दिसले. जोस बटलरने 39 तर यशस्वी जयस्वालने 22 धावा केल्या.

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएल (IPL) 2022 च्या जेतेपदाची सामन्यात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) निर्धारित 20 षटकांत 9 बाद 130 धावांपर्यत मजल मारली आणि गुजरात टायटन्ससमोर (Gujarat Titans) विजयासाठी 131 धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातने शानदार गोलंदाजी करत राजस्थान मोठी धावसंख्या करू दिली नाही. कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक तीन विकेट घेत गोलंदाजांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. याशिवाय साई किशोरने 2, तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसनने 1-1 गडी बाद केला. दुसरीकडे, गुजरातच्या गोलंदाजीपुढे रॉयल्सचे फलंदाज अक्षरशः हतबल दिसले. जोस बटलरने (Jos Buttler) 39 तर यशस्वी जयस्वालने 22 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)