IPL 2022, DC vs SRH: डेविड वॉर्नरचे धुव्वाधार अर्धशतक, पॉवेलच्या फटकेबाजीपुढे सनरायझर्सचे गोलंदाज हतबल, दिल्लीने ठेवले 208 धावांचे टार्गेट; Umran Malik ची झाली धुलाई

IPL 2022, DC vs SRH Match 50: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघाने आपला स्टायलिश सलामीवीर डेविड वॉर्नरच्या धुव्वाधार फलंदाजीच्या जोरावर तीन बाद 207 धावा केल्या आणि हैदराबादला विजयासाठी 208 धावांचे टार्गेट दिले. वॉर्नरने 92 धावांची खेळी केली तर रोवमान पॉवेलने 35 चेंडूत 67 रन्स केले. हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक आपल्या चार षटकांत चांगलाच महागात पडला.

IPL 2022, DC vs SRH: डेविड वॉर्नरचे धुव्वाधार अर्धशतक, पॉवेलच्या फटकेबाजीपुढे सनरायझर्सचे गोलंदाज हतबल, दिल्लीने ठेवले 208 धावांचे टार्गेट; Umran Malik ची झाली धुलाई
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs SRH Match 50: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आपला स्टायलिश सलामीवीर डेविड वॉर्नरच्या (David Warner) धुव्वाधार फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत तीन बाद 207 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे हैदराबादला विजयासाठी 208 धावांचे टार्गेट मिळाले आहे. वॉर्नरने 92 धावांची खेळी केली तर रोवमान पॉवेलने (Rovman Powell) 35 चेंडूत 67 रन्स केले. याशिवाय कर्णधार ऋषभ पंतने 26 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, वॉर्नर आणि पॉवेलच्या तुफानी खेळीपुढे सनरायझर्सचे धाकड गोलंदाज अक्षरशः फिके पडले. लक्षणीय आहे की हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) आपल्या चार षटकांत चांगलाच महागात पडला. मलिकने ओव्हरमध्ये एकही विकेट न घेतला 52 धावा लुटल्या. सीन एबोट, भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2022 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).