Virat Kohli Catch Video: बेंगलोर सुपरस्टारने Rishabh Pant याचा एकाच हातात घेतलेला अफलातून झेल पाहून सासूबाई भलतीच खुश, स्टॅन्डमधून दिली अशी रिअक्शन

मोहम्मद सिराजच्या 17 व्या षटकात ऋषभ पंतने हवेत कव्हर्सवर फटका खेळला. तिथे उभ्या कोहलीने पूर्ण क्षमतेने झेप घेतली आणि मागे पळू एकाहातात झेल पकडला. यानंतर विराटने स्टॅन्डमध्ये पत्नी अनुष्का आणि सासूबाई यांना विजयी चिन्ह दाखवले, ज्यावर सासूबाईंनी देखील प्रतिसाद दिला.

विराट कोहलीच्या झेलने सासूबाई प्रभावित (Photo Credit: Twitter)

IPL 2022, DC vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार विराट कोहली (Virat Kohli) दिल्लीविरुद्ध बॅटने फारसा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला, पण मैदानावर त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. धावांचा पाठलाग करताना 17 व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत (Rishabh Pant) चांगलीच फटकेबाजी करत होता. तथापि, तिसरा चेंडू वाइड होता आणि तो पंतने हवेत कव्हर्सवर खेळला. तिथे फिल्डिंग करणाऱ्या कोहलीने पूर्ण क्षमतेने झेप घेतली आणि मागे पळू एकाहातात झेल पकडला. यानंतर विराटने स्टॅन्डमध्ये पत्नी अनुष्का आणि सासूबाई यांना विजयी चिन्ह दाखवले, ज्यावर सासूबाईंनी देखील प्रतिसाद दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)