IPL 2022, DC vs KKR Match 41: कुलदीप यादवच्या फिरकीची जादू, कोलकताने 35 धावांत गमावल्या चार विकेट

IPL 2022, DC vs KKR Match 41: कुलदीप यादवने आपल्या डावातील पहिल्याच षटकात दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग विकेट घेतल्या. कुलदीपने दुसऱ्या चेंडूवर बाबा इंद्रजीतला बाद केले, तर तिसऱ्या चेंडूवर सुनील नारायणला खाते न उघडता माघारी धाडलं. मात्र, हॅटट्रिक घेण्यापासून तो हुकला. अशाप्रकारे केकेआरने अवघ्या 35 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत.

कुलदीप यादव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या एकाच षटकांत कोलकात्याला सलग दोन धक्के देऊन त्यांना अडचणीत टाकले आहे. कुलदीपच्या दुसऱ्या बॉलवर बाबा इंद्रजित (Baba Indrajit) मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 6 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढील बॉलवर यादवने सुनील नारायणला (Suni Narine) पायचीत पकडले. अशाप्रकारे केकेआरने अवघ्या 35 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement