IPL 2022, DC vs KKR Match 41: कोलकात्याला मोठा दिलासा, डेविड वॉर्नर 42 धावा करून आऊट

IPL 2022, DC vs KKR Match 41: उमेश यादवने कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठे यश मिळवून दिले आणि दिल्ली कॅपिटल्सचा घातक सलामीवीर डेविड वॉर्नरला अर्धशतक पूर्ण करू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर वॉर्नर 26 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. अशाप्रकारे दिल्लीची ही तिसरी विकेट पडली आहे, तर उमेशने सामन्यातील दुसरी विकेट घेतली.

डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

IPL 2022, DC vs KKR Match 41: उमेश यादवने (Umesh Yadav) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला मोठे यश मिळवून दिले आणि दिल्ली कॅपिटल्सचा  (Delhi Capitals) घातक सलामीवीर डेविड वॉर्नरला (David Warner) अर्धशतक पूर्ण करू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर वॉर्नर 26 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार मारले. अशाप्रकारे दिल्लीची ही तिसरी विकेट पडली आहे, तर उमेशने सामन्यातील दुसरी विकेट घेतली. तत्पूर्वी, उमेशने पहिल्या चेंडूवर पृथ्वी शॉ याला माघारी धाडले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement