IPL 2022, CSK vs PBKS Match 11: मैदानात उतारण्याआधी MS Dhoni याची करामात, T20 क्रिकेटमध्ये ‘हा’ टप्पा गाठणारा ठरला दुसरा भारतीय
IPL 2022, CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्यानंतर खेळाच्या झटपट फॉरमॅटमध्ये 350 किंवा अधिक सामने खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी, IPL 2022 मध्ये मुंबईत लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा धोनी सहावा भारतीय बनला होता.
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) यष्टिरक्षक-फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) रविवारी T20 फॉरमॅटमध्ये त्याचा 350 वा खेळण्यासाठी सज्ज आहे. धोनी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) हा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)