IPL 2022, CSK vs KKR: श्रेयस अय्यर याने जिंकला टॉस, कोलकाताचे चेन्नईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; पहिल्या सामन्यासाठी 11 खेळाडूंसह दोन्ही संघ मैदानात उतरणार

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यासाठी दोन्ही संघ दमदार खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs KKR: आयपीएल (IPL) 15 च्या सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने आले आहेत. चेन्नईचे नेतृत्व रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) करत आहे, तर कोलकाताची कमान श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या हाती आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium) या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यासाठी दोन्ही संघ दमदार खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग XI: रविंद्र जडेजा (कर्णधार), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे आणि एडम मिल्ने.

कोलकाता संभाव्य प्लेइंग XI: श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)