IPL 2022, CSK vs KKR: श्रेयस अय्यर याने जिंकला टॉस, कोलकाताचे चेन्नईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; पहिल्या सामन्यासाठी 11 खेळाडूंसह दोन्ही संघ मैदानात उतरणार
IPL 2022, CSK vs KKR: आयपीएल 15 च्या सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यासाठी दोन्ही संघ दमदार खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.
IPL 2022, CSK vs KKR: आयपीएल (IPL) 15 च्या सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने आले आहेत. चेन्नईचे नेतृत्व रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) करत आहे, तर कोलकाताची कमान श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या हाती आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium) या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यासाठी दोन्ही संघ दमदार खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.
Match 1. Kolkata Knight Riders won the toss and elected to field. https://t.co/brmob93z6Y #CSKvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग XI: रविंद्र जडेजा (कर्णधार), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे आणि एडम मिल्ने.
कोलकाता संभाव्य प्लेइंग XI: श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

