IPL 2022, CSK vs GT Match 29: रुतुराज गायकवाडचे झंझावती अर्धशतक, अंबाती रायडूची दमदार खेळी; गुजरात विरुद्ध चेन्नईची 169/5 धावांपर्यंत मजल

रुतुराजने सीएसकेकडून सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तर अंबाती रायुडूने 46 केल्या. दुसरीकडे, गुजरातसाठी अल्झारी जोसेफने सर्वाधिक दोन विकेट घेत छाप पाडली.

रुतुराज गायकवाड (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) झंझावाती खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 5 बाद 169 धावा केल्या आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titns) समोर विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य ठेवले. रुतुराजने सीएसकेकडून (CSK) सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तर अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) 46 आणि शिवम दुबे 19 धावा व कर्णधार रवींद्र जडेजा 21 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, गुजरातसाठी अल्झारी जोसेफने सर्वाधिक दोन विकेट घेत छाप पाडली. तसेच मोहम्मद शमी आणि यश दयाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.