IPL 2022: कोरोनाचे साईड-इफेक्ट्स! 22 एप्रिल रोजी पुणेच्या MCA ऐवजी आता वानखेडे स्टेडियमवर रंगणार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना
BCCI ने दिल्ली कॅपिटल विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 22 एप्रिल रोजी होणार्या आयपीएलचा 34 वा सामना पुणेच्या MCA स्टेडियम येथून वानखेडे स्टेडियमवर हलवण्याची घोषणा केली आहे. आजच्या RT-PCR चाचणीत न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टिम सेफर्ट पॉझिटिव्ह आल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमधून 6 व्या कोविड प्रकरणाची नोंद केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून स्थळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी 22 एप्रिल 2022 रोजी होणार्या मॅच क्रमांक 34 – दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) पुणे च्या MCA स्टेडियम येथून वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हलवण्याची घोषणा केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)