IPL 2022: पहिल्या विजयाची चव चाखलेल्या मुंबई इंडियन्सला तगडा झटका; Tymal Mills उर्वरित सामन्यातून ‘आऊट’, 21 वर्षीय दक्षिण आफ्रिकी खेळाडूशी केला करार
इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित सामन्यानातही मुंबई इंडियन्सने डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सच्या जागी ट्रिस्टन स्टब्सशी करार केला आहे. मिल्सच्या घोट्याला दुखापत झाली असून तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याची जागा घेणारा स्टब्स हा दक्षिण आफ्रिकेचा 21 वर्षीय युवा यष्टिरक्षक आहे. त्याने 17 टी-20 सामन्यात 157.14 च्या स्ट्राइक रेटने तीन अर्धशतकांसह 506 धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या (IPL) 15 व्या पर्वात विजयाची पहिली चव चाखलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) दुखापतीमुळे आता उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सचा (Tristan Stubbs) फ्रँचायझीने संघात समावेश केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)