IPL 2021: Delhi Capitals संघासाठी खुशखबर, Anrich Nortje याने केली कोविड-19 वर मात, दिल्ली संघात झाला समावेश
यापूर्वी वेगवान गोलंदाज कोरोना पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं होत मात्र फ्रँचायझीने आता अहवाल चुकीचा असल्याची पुष्टी केली आहे. शिवाय, टीम बबलमध्ये सामील होण्यापूर्वी नॉर्टजेचे तीन कोरोना व्हायरस अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्ट्जे (Anrich Nortje) राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसर्या सामन्यानंतर संघाच्या बायो बबलमध्ये सामील झाला आहे. यापूर्वी वेगवान गोलंदाज कोरोना पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं होत मात्र फ्रँचायझीने आता अहवाल चुकीचा असल्याची पुष्टी केली आहे. शिवाय, टीम बबलमध्ये सामील होण्यापूर्वी नॉर्टजेचे तीन कोरोना व्हायरस अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संघात सामील होण्यापूर्वी नॉर्टजेच्या तीन कोविड टेस्ट नकारात्मक आल्याची देखील पुष्टी केली. ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की त्याचा यापूर्वीचा सकारात्मक अहवाल योग्य नव्हता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)