जोफ्रा आर्चरची IPL 2021 मधून एक्सिट, राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का; इंग्लंड बोर्डाने केली घोषणा

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल 14 मधून एक्सिट झाली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवार, 23 एप्रिल रोजी याबाबत पुष्टी केली.

जोफ्रा आर्चर (Photo Credit: Getty)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या गुणतालिकेत तळाशी असलेल्या राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) तिसरा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची  (Jofra Archer) दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल 14 मधून एक्सिट झाली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) शुक्रवार, 23 एप्रिल रोजी याबाबत पुष्टी केली. तत्पूर्वी राजस्थानचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स देखील बोटाच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता. त्यानंतर गेल्या एका वर्षापासून बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे झालेल्या थकवामुळे लीम लिविंगस्टोनने देखील मध्यातून इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)