IND vs SA 1st T20I: पहिल्या T20 मध्ये भारताचा दणदणीत विजय, गोलंदाजांनंतर राहुल-सूर्या चमकले

भारताकडून अर्शदीपने 4 षटकात 32 धावा देत तीन बळी घेतले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. अर्शदीप सिंगच्या तीन विकेट्स आणि दीपक चहरच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका पत्त्याच्या गठ्ठाप्रमाणे कोसळली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने 4 षटकात 32 धावा देत तीन बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 41 धावा केल्या. तर भारताकडून केएल राहुलने नाबाद 51 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)