AUS vs SA CWC 2023 Semi Final Live Streaming: अंतिम फेरीतील भारताचा प्रतिस्पर्ध्याचा निर्णय होणार आज, ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार दुसरा उपांत्य फेरीचा सामना; येथे पाहा लाइव्ह
दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दुपारी 2 वाजता होणार आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
पाच वेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) दुसऱ्या उपांत्य फेरीत आज आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दुपारी 2 वाजता होणार आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया लीग टप्प्यात आमनेसामने आले, तेव्हा टेम्बा बावुमाच्या संघाने कांगारूंना दणदणीत पराभव दिला. या रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स मराठी आणि स्टार स्पोर्ट्स यासारख्या इतर अनेक भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेलवर चाहत्यांना जागतिक सामन्यांचा आनंद घेता येईल. चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. (हे देखील वाचा: Anushka Sharma ने 50 व्या एकदिवसीय शतकानंतर अभिनंदन करताना Virat Kohli चा उल्लेख केला 'God's Child')
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)