ICC Test Rankings: कसोटी इतिहासातील सर्वात लहान सामना जिंकूनही भारताचे नुकसान, हिसकावून घेतला नंबरचा 1 चा मुकुट

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने भारताला एका रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. ऑस्ट्रेलिया सध्या पाकिस्तानसोबत कसोटी मालिका (AUS vs PAK) खेळत आहे. या मालिकेत यजमान संघ ऑस्ट्रेलियाने सलग दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे, तर तिसऱ्या सामन्यातही त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

Team India Loses Number 1 Spot: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) केपटाऊनमध्ये कसोटी (Cape Town Test) इतिहासातील सर्वात लहान सामना 7 विकेटने जिंकला. मात्र असे असतानाही भारताची क्रमवारीत (ICC Test Ranking) एका स्थानाने घसरण झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने भारताला एका रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. ऑस्ट्रेलिया सध्या पाकिस्तानसोबत कसोटी मालिका (AUS vs PAK) खेळत आहे. या मालिकेत यजमान संघ ऑस्ट्रेलियाने सलग दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे, तर तिसऱ्या सामन्यातही त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे. यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने आयसीसी क्रमवारीत गुणांची आघाडी मिळवली आहे. आयसीसीने शुक्रवारी नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया 30 सामन्यांमध्ये 3534 गुणांसह 118 रेटिंगवर नंबर वन बनला आहे. तर, भारतीय संघाने 32 सामन्यांत 3746 गुण मिळवले आहेत, परंतु संघाचे रेटिंग 117 आहे, जे ऑस्ट्रेलियापेक्षा थोडे मागे आहे. (हे देखील वाचा: IND W vs AUS W 1st T20 Live Streaming: वनडेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय महिला संघ टी-20 मध्ये भिडणार कांगारुशी, येथे पाहा थेट लाइव्ह)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now