IND vs SA 2nd T20I Live Update: भारताला दुसऱ्या षटकात दुसरा धक्का, शुभमन गिलपण शुन्यावर बाद
मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशा स्थितीत आता उर्वरित दोन सामने जिंकणारा संघच मालिकेवर कब्जा करेल. अशा स्थितीत प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना गकेबरहा शहरातील सेंट जॉर्ज पोर्क येथे खेळला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशा स्थितीत आता उर्वरित दोन सामने जिंकणारा संघच मालिकेवर कब्जा करेल. अशा स्थितीत प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताला दुसरा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 12/2
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)