India Beat South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुध्द भारतीय महिला संघाचा शानदार विजय, टी-20 मालिका बरोबरीत सुटली

भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिकेतील तिसरा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुध्द 10 विकेट राखुन विजय मिळवला आहे.

India Beat South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुध्द भारतीय महिला संघाचा शानदार विजय, टी-20 मालिका बरोबरीत सुटली
IND vs SA

IND W vs SA W 3rd T20I: भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ (IND W vs SA W) यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिकेतील तिसरा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुध्द 10 विकेट राखुन विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ही मालिका बरोबरी सोडवली आहे. त्ततपुर्वी, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 85 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून पुजा वस्त्राकरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 10 विकेट राखुन हा सामना जिंकला. भारताचे सलामीवीर स्मृती मानधना (54) आणि शेफाली वर्मा (27) धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 09:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).