Indian Deaf Cricket Team Warm Welcome: या आठवड्याच्या सुरुवातीला यजमान इंग्लंडला सात सामन्यांच्या T20 मालिकेत 5-2 ने पराभूत करून मायदेशी परतलेल्या भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचे चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाने 18 जून ते 27 जून 2024 दरम्यान इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय T-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाचा 5-2 असा पराभव करून इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयाबद्दल, भारतीय कर्णबधिर संघाच्या सर्व सदस्यांचे गुरुवारी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते अभिनंदन व सन्मान करण्यात आला. (हेही वाचा - Rohit Sharma Special Welcome By Childhood Friends: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माचं बालपणीच्या मित्रांनी केलं खास स्वागत (Watch Video))
पहा व्हिडिओ -
VIDEO | Members of the Indian deaf cricket team receive warm welcome as they arrive at #Chennai airport. The Indian deaf cricket team defeated hosts England 5-2 in a seven match T20 series earlier this week.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/a4uLluZIla
— Press Trust of India (@PTI_News) July 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)