Indian Cricket Team Victory Parade: 'मरीन ड्राईव्हकडे जाणे टाळा'; भारतीय क्रिकेट संघाच्या विजय परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी खेळाडू विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे मार्गस्थ झाले आहेत.
Indian Cricket Team Victory Parade: टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दिल्लीहून मुंबईत पोहोचला आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी खेळाडू विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे मार्गस्थ झाले आहेत. मरीन ड्राईव्हवर खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र आले आहेत. मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. अशात मुंबई पोलिसांनी मरीन ड्राईव्हकडे प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई पोलीस म्हणतात, ‘भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेसाठी वानखेडे स्टेडियम व आजूबाजूला परिसरात चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली असून, नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणे टाळावे.’ (हेही वाचा: Team India's Flight Gets Water Salute At Airport: विमानतळावर उतरताच टीम इंडियाच्या फ्लाइटला देण्यात आलं वॉटर सॅल्युट, पाहा व्हिडिओ)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)