IND vs AUS 3rd Test Day 2 Live Score Updates: भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी, लंचपर्यंत टीम इंडियाने एकही विकेट न गमावता केल्या 13 धावा
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 54 षटकांत 4 गडी गमावून 156 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडिया 33.2 षटकात अवघ्या 109 धावांवर आटोपली. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनमनने सर्वाधिक 5 बळी घेतले. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ 76.3 षटकात 197 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 88 धावांची आघाडी घेतली आहे. इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 13 धावा केल्या आहेत. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा क्रीजवर उपस्थित आहेत.