IND vs AUS 1st T20 Toss Update: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दोन्ही संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया नवी सुरुवात करणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेचे नेतृत्व करणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया नवी सुरुवात करणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेचे नेतृत्व करणार आहे. तर, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड आहे. भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा